भ्रृशुंड ढोल ताशा पथक व भ्रृशुंड फांऊडेशनचा 'एक पेन एक वही एक पेन उपक्रम

कविता मोरे/नागपुरे
भंडारा: सामाजिक बांधीलकी जोपासणारे आणि नेहमी वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या भ्रृशुंड ढोल ताशा पथक व भ्रृशुंड फांऊडेशनने होतकरु व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करुन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.‘एक वही एक पेन’ या अनोख्या आणि डोळस उपक्रमाने भ्रृशुंड ढोल ताशा पथक व भ्रृशुंड फांऊडेशन विद्यार्थ्यांंमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण करुन त्यांना पाठबळ देण्याचे काम करीत आहे.

ग्रामीण व शहरी भागातील शाळांमध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना शिक्षणाची प्रचंड आवड आहे मात्र शिक्षणाचा खर्च पेलणे त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. काही मुले परिस्थितीमुळे शाळेत जाऊ शकत नाहीत. शिक्षणाकरिता महागाडे दप्तर, वॉटर बॉटल, टिफीन किंवा इतर साहित्यांची गरज नाही तर एक वही आणि एका लेखणीही पुरेशी आहे. मात्र कित्येक विद्यार्थ्यांच्या नशीबी हे देखील नसते. आजही अनेक विद्यार्थी जुन्या वह्यांची कोरी पाने फाडून वह्या तयार करतात व त्यांची गरज भागवतात. या गरजू व होतकरु विद्यार्थ्यांंसाठी काहीतरी करता यावे, त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने 


भ्रृशुंड ढोल ताशा पथक व भ्रृशुंड फाउंडेशनने 'एक पेन एक वही' या उपक्रमाअंतर्गत शाळांमध्ये व वस्तींमध्ये जाऊन वह्या व पेन वाटप करण्यात सुरुवात केली. २९ जून २०१८ रोजी कस्तूरबा गांधी विद्यालय, बेळगांव येथील ३० गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६ वहया व दोन पेन असे शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी विद्यालयाचे प्राध्यापक कुकडे, शिक्षक वर्ग व फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्याच प्रमाणे गांधी चौक भंडारा येथील महात्मा पुâले वार्डातील ८ मुला मुलींना वह्या आणि पेन देण्यात आले. तसेच कुंभारटोली व चांदणी चौक भंडारा येथील ३५ गरजू मुला मुलींना बजाज शाळा येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांना शिक्षणाचे महत्व विशद करुन त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या छोटा बाजार परिसरातील ९ गरजवंताना देखील वह्या आणि पेन भेट म्हणून देण्यात आले. विद्यार्थ्यांना नविन कोऱ्या वह्या आणि पेन मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.


सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी याकरिता भ्रृशुंड ढोल ताशा पथक व भ्रृशुंड फांऊडेशनने 'एक वही एक पेन' या अभियानाकरिता समाजातील नागरिकांना वह्या आणि पेन देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनी भरगोस प्रतिसाद देत मोठया प्रमाणात वह्या आणि पेन जमा करण्यात आले. त्यामुळे ‘एक वही एक पेन’ हा अभियान सामाजिक जाणीवा निर्माण करणारा ठरत आहे. भ्रृशुंड ढोल ताशा पथक व भ्रृशुंड फांऊडेशन हे सतत नाविन्यपूर्ण व सामाजिक उपक्रम राबवित असून वृक्षारोपण कार्यक्रम इकोफ्रेंडली गणेश स्पर्धा, उन्हाळी शिबीर, किशोर वयीन मुलीमध्ये मासिक पाळीबद्दल जागृती निर्माण करणे असे अनेक समाजोपयोगी उपक्रम निशुल्क राबविले जातात. यापैकी एक अनोखा उपक्रम ‘एक वही एक पेन’ हा असून या उपक्रमामुळे शाळा बाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यास मदत होईल अशी आशा फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours