सपादीका.. सुनिता परदेशी
धुळे जिल्ह्यातील विमुक्त भटक्या समाजाच्या पाच भिक्षुकांना मुले पकडणारी टोळी समजुन निर्घुंणपणे ठार करणा-या समाजवंâटक नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी पावसाळी अधिवेशनावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार तथा आमदार हरिभाऊ राठोड, मच्छींद्र भोसले, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार,नारायण शिंदे यांनी केले. 
भर पावसातही या आंदोलनाला विमुक्त भटक्या समाजबांधवासह अनेकांची लक्षणीय उपस्थिती होती. केवळ एका अफवेमुळे पाच निर्दोष लोकांना समाजकंटकांच्या क्रूरतेला बळी पडावे लागले हि पुरोगामी महाराष्ट्राच्या ईतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना आहे. समाजमाध्यमांचा चुकीचा वापर यासाठी कारणीभूत आहे असे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. 
नागपुर येथे पावसामुळे अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असूनही एका क्रूर घटनेच्या निषेधार्थ समाज एकवटतो हे समाजात संवेदनशीलता व माणुसकी शिल्लक असल्याचेच उदाहरण असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. या मोर्चाच्या आयोजनासाठी प्रा.माधव सरकुंडे, नारायण शिंदे, पत्रकार आनंद कसंबे, रघुनाथ शेंगर, शिवाजी जगताप, साहेबराव पवार,रवी कोष्टे,अरुण मांडवकर, सुनील मांडवकर, काशिनाथ शिंदे, सुरेश शिंदे, सुंदरलाल शिंदे, सोपानराव कांबळे यांनी मोर्चाच्या आयोजनात पुढाकार घेतला. 
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात राईनपाडा येथे मुलांचे अपहरण करणारी टोळी समजुन गावातील नराधमांनी पाच निष्पापांना क्रूरपणे ठार केले. मृतकांमध्ये दादाराव शंकर भोसले, भारत शंकर भोसले, राजू श्रीमंत भोसले, अगणू शंकर इंगोले, भारत शंकर माळवे यांचा समावेश आहे. या घटनेतील दोषींना शिक्षा मिळावी तसेच मृतकांच्या कुटूंबाला सरकारी नोकरी व २५ लाख रूपयांची मदत, भटक्या विमुक्तांसाठी तिसरी अनुसूची तयार करावी या मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours