औरंगाबाद: मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्यापाठोपाठ  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही राजीनामा दिलाय. दोन्ही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवलाय. भाऊसाहेब चिकटगावकर हे राष्ट्रवादीचे वैजापूरचे आमदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असं चिकटगावकर यांनी सांगितलं.

तर कन्नडमध्ये शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षण साठी ठिय्या आंदोलन केलं होतं. आंदोलनादरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी सरकारने मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी केली होती. जर सरकारने 24 तासात निर्णय घेतला नाहीतर आमदारकीचा राजीनामा देईन अशी घोषणाच जाधव केली होती. अखेर 24 तासात मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही त्यामुळे जाधव यांनी आपला राजीनामा आज विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला आहे.

चर्चा अर्जुन तेंडुलकरची, पण भाव खाल्ला अकोल्याच्या अर्थवने!

तर दुसरीकडे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. मराठा आंदोलन प्रकरण चिघळू नये म्हणून त्वरीत निर्णय घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याचं राणे म्हणाले. तसंच दोन तीन दिवसात प्रकरणावर पडदा पडून परिस्थिती निवळेल अशी शक्यता देखील नारायण राणेंनी वर्तवलीय.

दिवसभरात ‘या’ ठिकाणी पेटलं मराठा आंदोलन

आरक्षणवरून मराठा समाजाचा उद्रेक झालाय. आंदोलन चिघळू नये म्हणून हस्तक्षेप करण्यासाठी मी आज मुख्यमंत्र्यांना भेटलो. यात हस्तक्षेप केला जावा, सरकारने विचार करावा आणि त्वरित निर्णय घ्यावा अशी त्यांना विनंती केली असं नारायण राणे म्हणाले. दोन ते तीन दिवसात हालचाली होतील आणि यावर पडदा पडेल. पत्रकारांनी काही असे शब्द वापरू नका की आंदोलन चिघळेल असंही राणे म्हणाले. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर गेले होते.
 कायगाव टोका पुलाला काकासाहेब शिंदेंचं नाव
संभाजी ब्रिगेडने कायगाव टोका पुलाचे स्मृतीषेश काकासाहेब शिंदे पूल असे नामकरण केले आहे. मराठा आंदोलनादरम्यान जलसमाधी घेतलेला तरूण काकासाहेब शिंदे यांच्या स्मृती जपण्यासाठी पुलाला शिंदेचे नाव देऊन पुलाजवळ त्यांच्या नावाचा बोर्ड लावण्यात आला आहे.
अहमदनगर रोडवरील कायगाव इथं मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 23 जुलै रोजी दुपारी जलसमाधी आंदोलन केलं होतं. कायगाव टोका येथील गोदावरी पात्रावरील पुलावर त्यांनी हे आंदोलन केलं. पण हे आंदोलन सुरू असताना काकासाहेब शिंदे नावाच्या तरूणाने नदीतच उडी घेतली आणि नदीत बुडून त्याचा मृत्यू झाला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours