औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पुन्हा एकदा भाजपला फैलावर घेतलं आहे. ईव्हीएमचा फायदा घेऊन भाजप निवडणुका लढतेय असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. जनतेनं ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी वाट लावली असा टोलाही राज यांनी लगावला.
बाकीचे नालायक ठरल्याशिवाय लोकांनाही आमची आठवण होत नाही. त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांनी मात्र तुमचा सत्यानाथ केला, त्यामुळे मी आता काही बदल घडवण्यासाठी मराठवडा दौऱ्यावर आलो आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा करून अनेक गोष्टींवर बोलण्यासाठी या दौऱ्याचं आयोजन केलं असल्याचं राजने म्हटलं आहे.

अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये माझ्या उमेदवारांना शुन्य मत पडली आहे. असा घोळ कसा काय होऊ शकतो. म्हणजे या ईव्हीएम मशिनच्या घोळामुळे उमेद्वाराचं मतही मोजलं गेलं नाही असं उदाहरण देत राज ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली.

नाशिक महानगरपालिका 5 वर्ष आमच्या हाती होती. जे व्यवस्थापन नाशिकमध्ये आहे ते आज मुंबईतही नाही. बरं औरंगाबाद कचरा प्रश्न अजूनही का सुटत नाही असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours