मुंबई, 02 जुलै : अनुसूचित जातीजमातीच्या लोकांचं कारण पुढे करून एक विशिष्ठ सवर्ण समाज अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करतोय, असा आरोप रामदास आठवलेंनी बारामतीत केला. या कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी काही बदल केले जाणार असल्याची माहितीही आठवले यांनी दिली आहे.
दरम्यान, बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंच्या सभांवर राज्य सरकारनं बंदी आणावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर हे आपल्यापेक्षा ज्येष्ठ असून त्यांनी तयारी दर्शवल्यास आपण दोन पावले मागे घेण्यास तयार असल्याचंही ते म्हणाले.
दलितांना पुढे करून मराठा समाजातील लोक स्वार्थासाठी अॅट्रासिटी कायद्याचा गैरवापर करतात असा गौप्यस्फोट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलाय. या कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी काही बदल केले जाणार असल्याची माहितीही आठवले यांनी दिली आहे.
प्रकाश आंबेडकर हे आपल्यापेक्षा ज्येष्ठ असून त्यांनी तयारी दर्शवल्यास आपण दोन पावले मागे घेण्यास तयार असल्याचं सांगत आठवले यांनी भारीपशी युती करण्यास आपण तयार असल्याचं स्पष्ट केलंय.
Post A Comment:
0 comments so far,add yours