पुणे : कॉसमॉस बँकेच्या सायबर दरोडा प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह राज्यातील विवध शहरांतील एटीएममधून रुपे कार्ड मार्फत हे पैसे काढण्यात आले आहेत. ज्यात सर्वाधिक पैसे मुंबई आणि कोल्हापूराती एटीएममधून काढल्या गेले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरप्रमाणे प्रॉक्सी सर्व्हर उभारुन परदेशातून 'व्हिसा कार्ड' मार्फत, तर भारतात क्लोन केलेल्या 'रुपे कार्ड' मार्फत अनेक शहरांतून पैसे काढण्यात आले आहेत. पंधरा हजारांहून अधिक विविध खात्यांमधून झालेल्या व्यवहारांद्वारे सुमारे ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा हा सायबर दरोडा घालण्यात आलाय. त्यात भारतातील ४१ शहरांमधील ७१ वेगवेगळ्या बँकांच्या एटीएममधून 'रुपे कार्ड' मार्फत 2.5 कोटी रुपये काढले गेले आहेत. भारतात ज्या-ज्या एटीएममधून पैसे काढण्यात आले आहेत, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात काम सुरू आहे. पोलिसांच्या हाती निम्मे फुटेजेस लागले आहेत. त्यामध्ये दिसणारी व्यक्ती ही प्रत्यक्ष खातेदारच आहे, की दुसरी कुणी याची आता खातरजमा करण्याचे काम सुरु आहे. परदेशातील कोणत्या देशातून व कोणत्या बँकेच्या एटीएममधील पैसे काढण्यात आले, याची माहिती व्हिसा कंपनीकडून मागविण्यात आली आहे़.
कॉसमॉस बँकेच्या सायबर दरोडा प्रकरणी बँकेकडून सुरक्षा ऑडिट केले जात असले तरी पोलिसांकडूनही स्वतंत्र सुरक्षा ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यीमुळे बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील असे त्यांनी सांगितले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours