पुणे, 04 ऑगस्ट : पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी आज भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांची निवड होणार आहे. मनसेतून भाजपध्ये दाखल झालेले राहुल जाधव नगरसेवक पदी निवडूण आल्यानंतर त्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेवर पहिल्यांदाच सत्ता स्थापन करणारा भाजपचा हा दुसरा महापौर असणार आहे. नियोजित महापौर राहुल जाधव यांचा नगरसेवक ते थेट महापौर असा राजकीय कारकीर्दचा चढता आलेख जरी दिसत असला तरी हा प्रवास त्यांच्यासाठी खूप खडतर होता. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या जाधव यांनी आपल्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 5 वर्षे रिक्षा चालवलेली आहे. आणि आज चे त्यांच्या शहराचे प्रथम नागरिक बनले आहेत.
मावळते महापौर नितीन काळजे आणि नियोजित महापौर राहुल जाधव यांच्यात अनेक साम्य आहेत. हे दोघेही भोसरीच्या आमदारांचे कट्टर समर्थक आहेत. दोघेही शेतकरी कुटुंबातील आहेत. दोघांनाही बैलगाडा शर्यतीची आवड आहे. दोघांचे शिक्षणही जवळपास सारखेच (काळजेंचे अकरावी, तर जाधवांचे दहावी झालेली आहे. दोघांचाही प्रभाग भोसरी मतदारसंघात आहे. भोसरीच्या आमदारांना 2014च्या मोदी लाटेत अपक्ष म्हणून निवडून आणण्यात दोघांचाही मोठा वाटा आहे. दोघेही पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील आहेत.
शेती परवडत नसल्याने दहावी होताच जाधव यांनी पॅगो रिक्षा पाच वर्षे घालवली. नंतर 2006ला मनसेसोबत काम करण्यास सुरूवात केली. 2012ला ते मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र, 2017 च्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेला रामराम ठोकत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि गेल्यावर्षी ते भाजपकडून निवडूनही आले. दादांचे कट्टर पाठीराखे असल्याने लगेच त्यांची स्थायी समितीवर वर्णीही लागली. मात्र, स्थायीचे अध्यक्ष न झाल्याने त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आणि आता ते पिंपरी चिंचवडचे महापौर म्हणून काम करणार आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours