औरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत निषेध नोंदवणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवक सय्यद मतीन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आज औरंगाबाद महापालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे संतापलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी अक्षरश: मतीनला चपलेने चोपले होते. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी कडे करून मतीन यांना सभागृहाबाहेर काढले.
समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय महापौरांनी घेतला. वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत सभागृह दाखविण्यात आली.
त्यानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाचा निषेध केला. त्यामुळे भाजपचे सदस्य संतप्त झाले. प्रमोद राठोड, राज वानखेडे, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे यांनी मतीन यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना अक्षरश: खाली पाडून लाथा- बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. माधुरी अदंवत यांनी तर मतीन यांना चपलेने मारले. या प्रकरणी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मतीन यांच्या वागण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पक्षाची अशी कोणतीही भूमिका नव्हती. मतीन यांची ती व्यक्तिगत भूमिका होती. मतीन यांनी असे का केले याबद्दल जाब विचारण्यात आला असून पक्षाचे नेते असाउद्दीन ओवेसी यांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून औरंगाबादेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  भाजपचे सर्व कार्यकर्ते सिटी चौक पोलीस ठाण्यात गोळा झाले होते.मतीन यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये भाजपचे नेते जमले होते. अखेर पोलिसांनी मतीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.  मात्र काही वेळा आधीच भाजपच्या एक कार्यकार्त्याची गाडी मतीन याच्या समर्थकांनी फोडली आणि चालकाला मारहाण ही केलीय. या सगळ्या गदरोळामुळे औरंगाबाद मधील काही भागात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours