शहापूर, 5 ऑगस्ट - शहापूर तालुक्यातील तुते गावात  दूषित पाण्यामुळे 18 जणांना अतिसाराची लागण झाली आहे. लागण झालेल्या रुग्णांवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामपंचायतीने साफसफाई न केल्यामुळे बोरवेलमध्ये दूषित पाणी गेले आणि त्या बोरिंगचे पाणी प्यायल्याने नागरिकांना उलट्या जुलाब होऊ लागले. रुग्णांना सध्या शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये ४ महिला १५ वर्षांची मुलगी आणि १३ पुरुष आहेत. पावसाळ्यात असे प्रकार सातत्याने होत असल्यामुळे जनता आता चांगलीच संतापली आहे. एकीकडे पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा त्रास होत असताना रिक्त कर्मचारीपदांमुळे शहापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचा बोजवारा उडाला आहे.  आरोग्य विभागातील अशी परिस्थिती रुग्णांसाठी त्रासाची ठरते आहे.
दरम्यान, तालुक्यातील किन्हवली, कसारा, अघई, पिवळी, डोळखांब, साकडबाव, शेंद्रूण, शेणवा, टाकीपठार, टेंभा, वासिंद या नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांत ५६ उपकेंद्रे असून तळवडा, गुंडे, वाशाला इथे फिरते पथक आहे. यातील तळवाडा, साकडबाव, टाकीपठार, कसारा येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त आहेत. तर, अनेक प्राथमिक केंद्रांत एएनएम, एमपीडब्ल्यू, वाहनचालक, शिपाई या पदांवर कोणीही नाही. तालुका मुख्यालयात तर सुपरवायझरचे पद रिक्त आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours