केरळमध्ये पाऊसाने कहर केलाय. केरळमध्ये पुराने थैमान घातले असून, सातत्याने कोसळत असलेला पाऊस आणि आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत पुरामुळे ३२४ जणांचा मृत्यू झाला असून, हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. १४ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. एका आठवड्यात १४५ जणांचा पावसामुळे बळी गेलाय. पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे पुरात अडकलेल्या ५०० कुटुंबांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
गेल्या १०० वर्षांतला केरळमधील हा सर्वात भीषण पूर असल्याचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांनी म्हटले आहे. केरळ सरकारने केंद्र सरकारकडे अजून ११ हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. दरम्यान, केरळमधील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राज्याच्या पूरस्थितीची हवाई पाहणी केली. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन बोलणे झाल्यावर केलेल्या ट्विटमध्ये मोदी यांनी म्हटले आहे की, केरळमधील स्थितीवर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे.
केरळमधून काही पर्यटक आणि स्थानिकांना कर्नाटकातील कोदागू जिल्ह्यात हलविण्यात आलं आहे. तिथल्या काही समाज मंदिर आणि सभागृहांमध्ये पुरग्रस्तांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. काही ठिकाणी खास निवाराशेडही उभारण्यात आलेत. या सगळ्या व्यवस्थेची पालकमंत्री सारा महेश यांनी पाहणी करुन पुरग्रस्तांशी संवाद साधला. तसेच हजारो रेनकोट केरळला रवाना करण्यात आले आहेत. एनडीआरएफच्या १२ तुकड्या केरळमध्ये युद्ध पातळीवर काम करत आहेत. केरळ- कर्नाटक दरम्यानच्या १७ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours