मुंबई: अवघ्या महाराष्ट्रात सध्या पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्यात. सोमवारी पेट्रोलचे दर प्रति लीटर 89.44 रुपये झाले तर रविवारी ते 89.29 रुपये होतं. डिझेल 17 पैशांनी वाढून 78.33 रुपये प्रति लीटरवर गेलं. पण राज्याच्या इतर शहरांच्या तुलनेत इंधन किंमती नांदेडमध्ये सर्वाधिक आहेत.
नांदेड जिल्ह्यात पेट्रोल 92 रूपये प्रतिलिटरला मिळतंय. राज्यात नांदेड जिल्ह्यात पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. धर्माबाद तालुक्यात पेट्रोल 92 रूपये 17 पैसे आणि डिझेल तब्बल 82 रूपये 89 पैसे लिटरनं मिळतंय. नांदेड आणि परभणी जिल्ह्याला सोलापूर डेपोमधून इंधन पुरवठा करण्यात येतो. सातत्यानं वाढणा-या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळं सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येतेय.
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात इंधनाच्या किंमती सर्वाधिक असण्याचं कारण म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवर सगळ्यात जास्त म्हणजे 39 टक्क्यांहून अधिक व्हॅट आकरण्यात येतो. यात पेट्रोलवर 9 रुपये आणि डिझेलसाठी एक रुपयाचा अधिभार आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील पेट्रोलवर राज्य सरकारने 25 टक्के व्हॅट लादला आहे, परंतु राज्याच्या इतर भागांमध्ये तो 26 टक्के आहे.
इंडियन ऑईल प्रवक्त्याने सांगितले की वाहतूक खर्चामुळे काही शहरांमध्ये इंधन किंमती मुंबईपेक्षा अधिक आहेत. माध्यमांच्या अहवालानुसार, यात परभणी, नंदुरबार, नांदेड, लातूर, जळगाव, बीड, औरंगाबाद आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहेत. इथं पेट्रोल 90 रुपयांपेक्षा जास्त आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours