नागपूर: उपराजधानी नागपुरमध्ये रेव्ह पार्टीचा पर्दाफाश झालाय. अमरावती रोडवरील गोंडखेरी गावाजवळ एका बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली. यानंतर बंगल्यावर छापा मारला असता मादक द्रव्यासह दारूचा मोठा जप्त करण्यात आला. या रेव्ह पार्टी प्रकरणी सहा मुली आणि आठ तरूणांना अटक करण्यात आलीय. छापा टाकलेल्या ठिकाणाहून नोटा मोजण्याची मशीन सापडल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशाचे व्यवहार होत असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
ग्रामिण पोलिसांनी अमरावती रोडवरील गोंडखैरी गावाजवळील एका बंगल्यात रेव्ह पार्टीचा पर्दापाश केला. यावेळी सहा मुली आणि आठ तरूणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या बंगल्यातून बंदी असेलल्या काही मादक द्रव्यासह दारुचा साठाही जप्त केलाय. हे मादक द्रव्य कुठले याचा शोध पोलिस घेताहेत.
दरम्यान, छापा टाकलेल्या ठिकाणाहून नोटा मोजण्याची मशिन सापडल्य़ाने ह्या ठिकाणी मोठ्य़ा प्रमाणात पैशाचे व्यवहार होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या कारवाईची माहिती कुणाला कळू नये म्हणून नागपूर ग्रामिण पोलिसांच्या विविध पोलिस स्टेशन्समधील कर्मचारी बोलावून ही कारवाई करण्यात आली. नागपूर ग्रामिणचे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours