पुणे: ऐण सणासुदीच्या काळात पुण्यात स्वाइन फ्लूचा विळखा वाढत असून बळींची संख्या दहावर पोहचली आहे. स्वाइन फ्लूने कहर केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
राज्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरूच आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी झाले आहे. याचा फायदा स्वाइन फ्लूच्या विषाणूंच्या वाढीस होत आहे. पुण्यात स्वाईन फ्ल्यूची साथ वाढलीय. जानेवारीपासून दहा जणांचा यात मृत्यू झालाय तर सुमारे 31 जण व्हेंटिलेटरवर आहेत, तर 85 जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचं समोर आलंय.
सध्या कडक उन्हाच वातावरण आहे. पाऊस उन्ह हे वातावरण विषाणूसाठी पोषक असतं. त्यामुळे पुणेकरांनी गर्दीच्या ठिकाणी जाण टाळावं आणि योग्य खबरदारी घ्यावी असं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात येतंय. पालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्ल्यू संशयितांवर उपचार केले जातात, तसेच ट्यामी फ्ल्यू देण्यात येतं आहे.
स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरासह जिल्ह्याभरात स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव वाढत आहे. स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. स्वाईन फ्लूला योग्य उपचार तसेच प्रतिबंधात्मक काळजी घेतल्यास हरवणे शक्य आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णाची वाढती संख्या आपण सर्वांनी मिळून कमी करायलाच हवी. यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचाराला प्राधान्य द्यावे. रुग्णाला सर्दी खोकला असेल तरीही स्वाईन फ्लूची तपासणी करायला सांगा. योग्य आहार, पुरेसा व्यायाम आणि घराबाहेर पडताना योग्य दक्षता घेतल्यास स्वाईन फ्लूवर मात करता येईल असा सल्ला तज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours