रिपोर्टर.. परदेशी
महाराष्ट्र अंनिसचा जाहीर कार्यक्रम -
भंडारा -आंधळगाव पाेलीस स्टेशन अंतर्गत माैजा मलदा येथे! 'एक गाव एक गणपती ' मांडण्यात आला. यानिमित्त मअंनिस चे जाहीर व्याख्यान कार्यक्रम घेण्यात आले  . या कार्यक्रमाच्या माध्यमातून दैवी चमत्कार सिद्ध करून दाखवा असे आव्हान विष्णूदास लाेणारे यांनी केले.  दैवी चमत्कार करणारे ढोंगी व बदमाश असतात. यांच्या प्रत्येक चमत्काराची तपासणी करावी असे सांगितले. यावेळी चंद्रशेखर भिवगडे, कैन्हैया नागपूरे, लिलाधर बन्साेड, पाेलीस ठाणेदार कमलेश साेनटक्के,  सरपंच साै. मनिषा गेडाम, भुपेन्द्र धुमनखेडे तसेच गावातील नागरीक उपस्थित हाेते.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours