मुंबई: डाॅल्बीवर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि पोलीस प्रशासनात वाद पेटलाय. तर दुसरीकडे गणपती विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि डॉल्बीच्या वापरावर तूर्तास मुंबई हायकोर्टाने बंदी घातलीये. सण येत जात राहतील मात्र आम्ही उत्सवातील गोंगाटाकडे दुर्लक्ष करू शकत नाही अशा शब्दात हायकोर्टाने डीजेवाल्यांचे कान उपटले आहे.
मात्र साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य आहे? असा सवाल करत या प्रकरणी राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश हायकोर्टानं दिलेत. दरम्यान, या प्रकरणी 19 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.
कोर्टाचा निर्णय
'सण येत जात राहतील पण..उत्सवातील गोंगाटाकडे आम्ही डोळे बंद करून पाठ फिरवू शकत नाही, गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीतील डीजे आणि डॉल्बीच्या वापरास तूर्तास परवानगी नाहीच. मात्र साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य?, असा सवाल हायकोर्टाने सरकारला विचारलाय.
दरम्यान, डॅाल्बीने प्रदूषण होतंय तर राज्यातील कंपन्यांच्या प्रदुषणाचे काय?, विश्वास नांगरे पाटील यांना पुणे फेस्टिव्हल डेसिबल दिसला नाही का ? असा सवाल साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलाय. तसंच मंगळवार तळे माझ्या मालकीचे तिथे काय करायचे काय नाही ते मी ठरवणार कंटेंट ऑफ कोर्ट होऊच शकत नाही आणि झाला तर तो माझ्यावर होईल अशा इशाराही उदयनराजेंनी दिला.
Post A Comment:
0 comments so far,add yours