भुसावळ : घातपात घडवण्याच्या उद्देशाने माथेफिरुंनी वरणगाव स्थानकापासून भुसावळकडे येताना चार किलोमीटर अंतरावर अप आणि डाऊन या दोन्ही रेल्वे मार्गावर मोठे दगड आणि दगडगोट्यांनी भरलेल्या सिमेंटच्या गोण्या ठेवल्या होत्या. दुपारी तीनच्या सुमारास भुसावळ-वर्धा पॅसेंजरच्या चालकाच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी प्रसंगावधान राखून ब्रेक दाबल्याने तब्बल १२०० प्रवाशांवरील विघ्न टळलं.

भुसावळ ते वर्धा ही पॅसेंजर (गाडी क्रमांक ५११९७) नेहमीप्रमाणे दुपारी भुसावळ स्थानकावरून सुटली. जी.एस.सहाना लोको पायलट, तर राहुल पाटील सहायक लोको पायलट होते. प्रवासादरम्यान वरणगाव स्थानक ४ किलोमीटर अंतरावर असताना चालक सहाना यांना गुरुवारी दुपारी २.४६ वाजता डाऊन लाईनवरील खांब क्रमांक ४५४/२८ ते ३० दरम्यान एक मोठा दगड आणि सिमेंटची गोणी रेल्वे रुळांवर ठेवल्याचे दिसलं. यामुळे त्यांनी गाडीचा ९५ किमी प्रतीतास वेगातील गाडीचे इमर्जन्सी ब्रेक दाबले.

तरीही गाडीचे इंजिन रुळावर ठेवलेल्या दगडाला धडकल्याने त्याचे कॅटल गार्ड तुटले. इमर्जन्सी ब्रेक दाबल्याने गाडी थांबली. मात्र, तिचा प्रेशर पाइप फुटला. यानंतर सहाना यांनी पॅसेंजरचे गार्ड अविनाश वागळे यांना पुढे बोलावून अप-डाऊन लाईनवरील गिट्टीने भरलेल्या गोण्या बाजूला फेकल्या.

वरणगावचे सहायक स्टेशन मास्तर सुबोध कुमार यांना माहिती दिली. यानंतर निरीक्षक नवीन कुमार, मुख्य लोको निरीक्षक एम.जे.रावत घटनास्थळी आलं. त्यांना अप खांब क्रमांक ४५४/२९ ते ४५५/२ दरम्यान रूळावर दोन गोण्या आढळल्या.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours