मुंबई : गणपती डान्स करणाऱ्या एका स्कूलगर्लचा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल. कालपासून या शाळेच्या युनिफॉर्ममधल्या मुलीचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होतोय. धम्माल नाचणारी ही शाळकरी मुलगी कोण आहे माहितीये? ही मुलगी आहे दित्या भांडे - मुंबईजवळ नालासोपाऱ्याला राहणाऱ्या मराठमोळ्या दित्यानेच या व्हिडिओची धम्माल सांगितली.

या व्हीडिओतली मुलगी शोधताना आम्हाला या डान्समागचं सत्यही उलगडलं आणि समजलं हा गणपतीपुढे केलेला डान्स नाहीच.

हा व्हीडिओ गणपती डान्सचा नसून एका कुट्टू डान्स नावाचा तमीळ नृत्यप्रकार आहे. हा व्हायरल व्हिडिओ कुठून आला याचा शोध घेत असताना हा  लक्ष्मी नावाच्या तमीळ सिनेमातला सीन असल्याचं समजलं. सिनेमात हा डान्स अंत्ययात्रेच्या सीनमध्ये येतो. या सिनेमातली ही मुलगी इतकी नृत्यवेडी असते की, म्युझिक वाजलं की नाचायला लागते अगदी फ्युनरल म्युझिकवरसुद्धा नाचते, असा हा सीन आहे.

ही धम्माल, बेफाम नाचणारी ही चिमुरडी आहे मराठमोळी दित्या भांडे. हिपहॉप डान्ससाठी प्रसिद्ध नालासोपाऱ्याचीच आहे ही दित्या. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours