मुंबई, 03 जून : मुंबईत आज संध्याकाळी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. भांडुप परिसरात दोन वेगवेगळ्या घटनेत वीजेचा शाॅक लागून 3 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.
भांडुपच्या खिडीपाडा या परिसरात वीज वितरण कंपनीच्या वायरचा शाॅक लागला आणि दोन जणांचा मृत्यू झाला. यात एक नऊ वर्षांच्या चिमुरडीचा  आणि 32 वर्षीय अनिल यादव यांचा समावेश आहे. या दोघांनाही मुलुंड येथील पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरणी त्यांना मृत घोषित केलं.
तसंच भांडुप स्टेशन परिसरात वीजेचा शाॅक लागून 1 जण मृत्युमुखी पडला तर एक जण जखमी झालाय. या जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours