कोची,03 जून : कोचीजवळच्या एडपल्लीमध्ये एका दाम्पत्यानं नवजात मुलीला चर्चमध्ये सोडून दिलं. कारण काय तर चौथ्यांदाही मुलगीच झाली, म्हणून समाज काय म्हणेल, लोक हसतील ही घृणास्पद आणि मागास भावना. सेंट जॉर्ज फोरन चर्चमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद झालाय.
बिट्टो असं या पुरुषाचं नाव आहे, आणि पत्नीचं नाव प्रतिभा. त्या दोघांना केरळच्या वडक्कनचेरीमधून अटक झालीये. या दोन नराधमांवर आयपीसीच्या कलम 317 आणि जुवेनाईल जस्टीस अॅक्टअंतर्गत गुन्हे दाखल झालेत.
बाळाला सोडून जाण्याआधी तिचा बाप तिचा मुका घेताना दिसतोय. म्हणजे बाळाला सोडताना मुका घ्यायची इच्छा होते, पण तिला साडून दिल्यावर तिचं काय होईल, तिचे हाल होऊ शकतील. जीवाला धोका निर्माण होईल, असा विचार मात्र या माणून म्हणण्यास योग्य नसलेल्या दाम्पत्याच्या डोक्यात आला नाही.
Post A Comment:
0 comments so far,add yours