सिद्धार्थ गोदाम, बीड, 03 जून : बीड येथे जन्मलेल्या परीची परवड काही संपेना. डीएनए रिपोर्टनुसार परीचे आई वडील तेच असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे परीला तिच्या आई वडिलांनी स्वीकारून औरंगाबादेतून नेले. मात्र बीडला नेऊन तिचा पुन्हा त्याग केला आणि बालकल्याण खात्याकडे सोपवले.त्यामुळे परीला पुन्हा औरंगाबादेतील एका खाजगी संस्थेकडे देण्यात आले आहे.
परीचा जन्म बीडच्या शासकीय रूग्णालयात झाला. डॅाक्टरांनी छायाला मुलगा झाल्याचं सांगितलं आणि बाळ आजारी असल्याने त्याला आईपासून वेगळे ठेवलं. मात्र ज्या वेळेस छायाने बाळाला बघितलं त्यावेळेस मुलगी दिसली. तेव्हा परीला तिच्या आई वडिलांनी स्वीकारण्यास नकार दिला.
या प्रकरणात परीच्या डीएनए चाचणीत परी छाया आणि संजू यांचीच मुलगी असल्याचं सिद्ध झालं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours