सातारा, 15 सप्टेंबर : साताऱ्यात एका भीषण अपघात तीन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. महाड - पंढरपूर महामार्गावर विडणी येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तीन युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विडणी, ता. फलटण सावतामाळी मळा येथील अक्षय रामचंद्र नाळे ( वय 23) राहूल रविंद्र नाळे ( वय 23) आणि अमित बबन नाळे ( वय.22) हे तिघेही पिंप्रद येथे जिमला जात होते आणि त्याच वेळी त्यांच्या गाडी अपघात झाला. यात या तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

जिमला जात असताना महामार्गावरील विडणी येथील अष्टविनायक रोपवाटीकेसमोर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात या तिघांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जातेय.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर धडक देणारे ते अज्ञात कोण होते याचा आता पोलीस कसून कसून तपास करत आहेत. पण अशा अपघातात आपल्या तरुण मुलांना गमावल्यानं नाळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours