जिल्हा संपादक शमीम आकबानी
भंडारा-३-९-२०१८ राेजी पाेलिस मुख्यालय कवायत मैदानावर भंडारा जिल्हा पाेलिस पावसाळी क्रिडा स्पर्धेचे उदघाटन माेठ्या आनंदमय वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत पाेलीस शिपाई महेश नैताम यांच्या हस्ते करन्यात आले.या कार्यक्रमाला मा.मुख्य न्याय दंडाधिकारी भंडारा प्रशांत कर्वे,मा.पाेलिस अधिक्षक विनीता साहु, मा.पाेलिस उपअधिक्षक (गृह) बनडाेपंत बनसाेडे,पाेलीस उपविभागीय अधिकारी भंडारा जाेगदंड, पाेलीस उपविभागीय अधिकारी तुमसर चे  माळी, उपविभागीय पाेलिस अधिकारी पवनी चे तिक्कस ,तसेच भंडारा जिल्ह्यातील पाेलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते.


या स्पर्धेमध्ये फुटबॉल,हॉकी,हँन्डबॉल,व्हालीबॉल,कबड्डी,खाेखाे या सांधीक खेळांचा समावेश असुन वैयक्तिक खेळ गाेळाफेक,भालाफेक,थाडीफेक,साईडजंप,लॉंगजंप अश्या क्रिडा प्रकारचा समावेश हाेता. या वेळी पाेलिस अधिक्षक विनीता साहु यांनी मार्गदर्शन करतांनी सांगितले कि,आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.या सर्व क्षेत्रात टिकायचे असेल तर तणावमुक्त जीवन आवश्यक आहे.परिस्थिती ही नेहमीच बदलत असते जसा आपल्याला वेळ मिळताे त्याचा आपन याेग्य खेळाच्या माध्यमातुन पुरेपुर उपयाेग केला पाहीजे.त्याच प्रमाणे आपनही आपले मनाविरुध्द परिक्षेत्रीय,राज्यस्तरिय व राष्ट्रिय स्पर्धेमध्ये यश प्राप्त करावे. खेळाडुने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन आपल्या जिल्ह्याचा नावलाैकिक करावा असे सांगितले.


या स्पर्धेमध्ये विनीता साहु यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवुन मान्यवरांचा गाैरव केला.या प्रसंगी २०० मीटर धावण्याचा प्रथम पुरस्कार  पुरुष स्पर्धेमध्ये महेश नैताम क्युआरटी भंडारा, द्वितीय राहुल फेन्डर यांनी तसेच महिला पाेलीस शिपाई मध्ये प्रथम पुष्पा बाेरकर,द्वितीय विजया घाेनमाेडे यांनी क्रमांक पटकावला ।


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours