केरळ, 19 ऑक्टोबर : केरळच्या शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून रणकंदन माजलं आहे. मोठ्या विरोधानंतर आता पोलीस बंदोबस्तात दोन महिला मंदिरात प्रवेश करणार आहेत. तेलंगणातील एका महिला पत्रकारासह एक सर्वसामान्य श्रद्धाळू महिला पोलिसांसह या मंदिरात प्रवेश करणार आहे.
दरम्यान, आज (शुक्रवारी)दोन महिला पत्रकारांनी मंदिरात जाऊन वार्तांकन करण्याची पोलिसांकडे परवानगी मागितली. सुरुवातीला पोलिसांकडून त्यांना परवानगी नाकारण्यात आली. पण या महिला पत्रकारांनी थेट पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतल्यानंतर आता त्यांना मंदिर प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. तब्बल 150 पोलिसांच्या बंदोबस्तात या महिला मंदिरात जातील.
नेमका काय आहे शबरीमाला मंदिराचा वाद?
शबरीमाला मंदिरात वर्षानुवर्ष स्रियांना प्रवेशबंदी आहे. मोठ्या लढ्यानंतर शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला. पण त्यानंतर केरळातील सामाजिक-राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महिलांचा मंदिर प्रवेश म्हणजे मंदिराची विटंबना आहे, असं म्हणत केरळात कथित संस्कृतीरक्षक रस्त्यावर उतरले आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours