उल्हासनगर, 19 ऑक्टोबर : उल्हासनगरमध्ये एक गंभीर प्रकार समोर आला आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार सुरू असल्याचं समोर आलं आहे. पहाटेपर्यंत हे डान्स बार सुरू असतात.
बारमध्ये नृत्य करणाऱ्या महिलांवर पैशांची उधळण करणं, अश्लील प्रकारे करणं असं या बारमध्ये सुरू होतं. तसं ऑर्केस्ट्रा म्हटलं की कलेचा जागर असतो पण इथे तर कलेच्या नावाखाली असा गैर कारभार सुरू आहे. ज्यात हल्लीची तरुणाई अगदी वाईट पद्धतीने अडकत आहे.
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्यावर कठोर कारवाई करायची सोडून उल्हासनगर पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली आहे. मोबाईलमध्ये बारमधले हे सगळे प्रकार कैद झाले आहे.
त्यामुळे राज्य सरकारने कितीही नियम बसवले तरी ते उल्हासनगरमध्ये मात्र धाब्यावर बसवले जात आहेत असं म्हणायला हरकत नाही. उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बार सुरू आहेत. त्यामुळे कुठेतरी गुन्हेगारीही वाढत आहे.
या सगळ्यावर बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता उल्हासनगरमधील सुजान नागरिक करत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी मुंबईमध्ये अनेक अवैधरित्या सुरू असलेल्या डान्स बारवर छापे टाकण्यात आले होते. अशाच एका छाप्यामध्ये मुंबई पोलिसांनी तब्बल 7 मुलींना रेस्क्यू केलं होतं.
ग्रँड रोडच्या संदीप पॅलेसमध्ये हा छापा टाकण्यात आला होता. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहताच बारमध्ये मोठा कल्ला झाला. ग्राहकांची पळापळ सुरू झाली,  पण सगळ्या बाजूने घेरत पोलिसांनी यात धाडीत 12 ग्राहक, 1 कॅशियर , 1 मॅनेजरला आणि 5 वेटरला ताब्यात घेण्यात आलं होतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours