मुंबई: शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला थेट लक्ष्य केलं. युती तुटताना जी घोषणा केली होती, त्याच घोषणेवर आम्ही आम्ही कायम आहोत. ती घोषणा काय होती हे शिवसैनिकांना समजलं असं सांगत त्यांनी भाजपशी जुळवून घेणार नाही हे स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा रोख हा पूर्णपणे भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाच होता. युती, दुष्काळ, हिंदुत्व, राम मंदिर, पाकिस्तान अशा अनेक विषयांवर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे...
युतीचं काय?
युती तुटत असतानाच मी एक घोषणा केली होती. आता किती वेळा तेच ते बोलायचं. ज्यांना ते समजलं त्यांना समजलं. शिवसैनिकांना ते समजलं. आता फक्त एकच काम करायचं आहे 2019 मध्ये महाराष्ट्रात भगवा फडकला पाहिजे. तीच शपथ सगळ्यांनी घ्यायची आहे. आम्ही अजुनही सत्तेत का? हा प्रश्न सगळे विचरतात. आमचं त्याला उत्तर आहे की आम्ही सत्तेचे बांधील नाही. सरकारमध्ये असलो तरी जे चुकतं त्याविरूद्ध बोलणारच. परिणामांची आम्हाला चिंता नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours