नागपूर: मुंबईतल्या इंदू मिलवरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम सरकार लवकरच पूर्ण करेल. 2020 पर्यंत स्मारकाचं लोकापर्ण करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने दीक्षाभूमीवर झालेल्या 62 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे आश्वासन दिलं. या कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले काही लोक जाणूनबुजून अफवा पसरविण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र राज्यातलं सरकार हे शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहु महाराज आणि महात्मा फुले यांच्यांच विचारांनी चालेल. गीता, बायबल आणि कुराण पेक्षा मला मुख्यमंत्री म्हणून बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाचा जास्त सन्मान आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगतिलं
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours