मुंबई: मुंबईच्या कलिना परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली आहे. गुजराल असं या इमारतीचं नाव आहे. आग लागताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आगीची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न  सुरू आहेत. तर सुदैवाने यात जीवित हानी झाल्याचं कोणतेही वृत्त नाही.
ही व्यावसायिक इमारत आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे कोणतीही हानी होण्याआधी आग विझवण्याचं काम अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours