रायगड, 31 डिसेंबर : रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. रात्री 2 वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपाघात झाला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
महाड एमआयडीसीच्या झुआरी फर्टीलायझर कंपनी परिसरातील ही घटना आहे. भरधाव वेगात येणारा ट्रेलर धडकल्याने त्यांच्या मृत्यू झाला आहे. त्यांच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण शिवसैनिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, कालगुडे यांचा मृत्यू घातपात की अपघात असा संशय शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता वेगवेगळ्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
तर पोलिसांनी कालगुडे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदानासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानुसार आता पोलीस तपास करणार आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours