2 डिसेंबर : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सर्वच पक्षांमधल्या नेत्यांनी त्यांचं कौतुक केलं. असं गोड कौतुक होत असताना मग त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी तरी मागे कसे राहतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणत्याही अडचणींमधून सहजरित्या मार्ग काढण्याची दैवी शक्ती आहे अशी 'स्तुती सुमनं' मुख्यमंत्र्यांचे खास विश्वासू सहकारी आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उधळलीत.
गिरीश महाजन म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येनं निघणाऱ्या मोर्च्यांमुळे सरकारवर दबाव वाढला होता. हे शिस्त बद्ध मोर्चे पाहून सरकारवर मोठं दडपण येत होतं अशी जाहीर कबुलीही त्यांनी दिली. एवढ्या मोठ्या  संख्येने आणि एवढ्या शिस्त बद्ध पद्धतीने  जगात कोठेही असे मोर्चे निघाले नाहीत. हे मोठ्या संख्येचे मोर्चे पाहिल्यावर पुढं काय होईल असं नेहमीच दडपण यायचं.
मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी दाखविलेला  संयम आणि धैर्य यामुळं हा प्रश्न त्यांनी कोणत्याही सरकारला किंवा मुख्यमंत्र्याला सोडविता आला नसता अशा पद्धतीने सोडविला. मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतर तर विरोधकांची तोंड पाहता येत नव्हती अशी त्यांची अवस्था  केविलवाणी झाली होती. नाईलाजास्तव का होईना, त्यांना सरकारला पाठिंबा द्यावा लगाल. असा टोलाही त्यांनी लगावल.
हिवाळी अधिवेशन संपण्याच्या आधी राज्य सरकारनं विधिमंडळात मराठा आरक्षणाचं विधेयक मांडून ते मंजूरही करून घेतलं. या निर्णयामुळं मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षण मिळालं आणि गेल्या कि्त्येक दशकांपासूनची मराठा समाजाची मागणी मान्य झाली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours