मुंबई: मुंबई काँग्रेस शहर अध्यक्ष संजय निरूपम यांना पक्षाने चांगलाच झटका दिला आहे. निरूपम यांना उत्तर पश्चिम ऐवजी उत्तर मुंबई या लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
काँग्रेसच्या निवड मंडळ समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निरूपम यांना उत्तर मुंबई मतदार संघ इथूनच निवडणूक लढवावी अशी सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. निरूपम यांना गुरूदास कामत यांच्या उत्तर पश्चिम या लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती. 
मुंबई काँग्रेसचा शहर अध्यक्षाचा मतदारसंघ जर बदला तर चांगला मेसेज जाणार नाही, असा सूर निरूपम यांनी लावला होता. परंतु, काँग्रेस नेत्यांनी जूने मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवू नका अशा सूचना दिल्ली हायकंमाडने दिल्या होत्या. त्यामुळे निवड समितीने निरुपम यांची मागणी धुडकावून लावली. 
निवड समितीच्या या निर्णयामुळे 5 मतदार संघापैंकी दक्षिण मुंबई व्यतिरिक्त इतर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून पुढील काळात तणाव निर्माण होण्याची चिन्ह आहे. दिवंगत नेते गुरूदास कामत यांच्या मतदारसंघातही कृपाशंकर सिंग यांना निवडणूक लढवण्यास विरोध होत आहे. 
प्रिया दत्त यांच्या मतदारसंघात बाबा सिद्दीकी आणि राज बब्बर यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे.
दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात एकनाथ गायकवाड यांच्यासह भालचंद्र मुनगेकर यांच्याही नावाची शिफारस दिल्लीकड होणार असल्याचं कळतंय.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours