मुंबई, २४ जानेवारी २०१९- आघाडी करायची की नाही, याबाबत ३१ जानेवापीपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर आम्ही आमची पुढची दिशा ठरवू, अशा इशारा प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला दिला आहे. ओवेसींच्या एमआय़एमला सोबत घेण्यावरून काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघात मतभेद आहेत. आघाडी करण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या काँग्रेससोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. काँग्रेस एमआयएमच्या मुद्यापलिकडे जायला तयार नाही.
आता ३० जानेवारीपर्यंत काँग्रेसने अंतिम निर्णय घ्यावा, अन्यथा ३१ जानेवारीला श्रीरामपूर येथे बैठक घेऊन वंचित बहुजन आघाडीची पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. जुलै २०१८ मध्ये वंचित बहुजन आघाडीची घोषणा करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी 'तुम्ही प्रकाश आंबेडकरांना सन्मानजनक जागा द्या मी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, असं विधान एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींनी केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाशी आघाडीसाठी बोलणी सुरू केली होती. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भारिपच्या नेत्यांसोबत या संदर्भात बैठकही घेतली होती. छगन भुजबळ यांच्यासोबतच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते आमदार बळीराम सिरस्कार, हरिदास भदे, विजयराव मोरे, प्रा. किसन चव्हाण, प्रा. सदानंद माळी आदी नेते उपस्थित होते. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours