मुंबई: डान्सबारसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर आणि विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेश हाती आल्यावर अधिक बोलणं योग्य राहिल. परंतु, विरोधक खोटारडे आरोप करत आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
डान्सबारबाबत अधिक कठोर कायदे करण्यात येतील. कोर्टाने दिलेल्या आदेशची अंमलबजावणी करण्याची सूचना पोलिसांना केल्या जातील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
नवाब मलिकांचा आरोप
डान्सबारवरची बंदी उठवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डील झाली, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. या बैठकीत मोठी आर्थिक देवाण घेवाण झाली. बार मालक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपच्या नेत्या शायना एन.सी. यांनी मध्यस्ती केली असा आरोपही मलिक यांनी केला होता.
Post A Comment:
0 comments so far,add yours