अहमदनगर, 19 फेब्रुवारी : अहमदनगरमधील वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्यासह 60 जणांना शहरबंदी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
अहमदनगर शहर पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अक्षेपार्ह वक्तव्य करणारा भारतीय जनता पक्षाचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम, त्याचा भाऊ श्रीकांत याच्यासह 60 जणांना शहरात एक दिवस बंदीची नोटीस बजावली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. तोफखाना पोलिसांनी 50, तर कोतवाली पोलिसांनी 10 जणांवर ही कारवाई केली आहे. 
कोण आहे श्रीपाद छिंदम?
श्रीपाद छिंदम हा अहमदनगर महापालिकेतील माजी उपमहापौर असून तो भाजपमध्ये होता. शिवजयंतीवेळी याच छिंदमने शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केलं. त्यानंतर राज्यभरात छिंदमविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. त्यानंतर भाजपने त्याची पक्षातून हकालपट्टी केली. याप्रकरणी काही दिवस तो तुरुंगातही होता. तुरुंगात कैद्यांकडून छिंदम याच्यावर हल्ला करण्याचा प्रकारही घडला होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत छिंदम पुन्हा निवडून आला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours