नागपूर: नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते स्मार्ट सिटीचं शनिवारी भूमीपूजन होणार आहे. पण यातील काही कामांमुळे लोकांचं नुकसान होत असल्याचं सांगत स्मार्ट सिटी पिडीत नागरीक मंचाने उद्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे.
या आंदोलनकर्त्यांचा स्मार्ट सिटीला विरोध नाही. पण यातील काही कामांमुळे लोकांचं नुकसान होत असल्याचं सांगत आंदोलकांनी प्रशासनाला 11 मागण्याचं निवेदन दिलं आहे. त्यामुळे मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात विरोध प्रदर्शन करणार असल्याचं शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगितलं आहे. 
आंदोलनाचा इशारा दिलेल्या सर्व संघटनांनी आज (शुक्रवारी) मनपा आयुक्तांची भेट घेतली. परंतु या भेटीनंतरही त्याचं समाधान झालं नाही. त्यामुळे आता स्मार्ट सिटी पिडीत नागरीक मंचाकडून उद्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भाजप वगळता सर्व मोठ्या राजकीय पक्षांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने उद्या नेमकं काय होणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours