मुंबई 18 फेब्रुवारी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युतीवर आज अखेर मोहोर उमटली. गेली काही महिने युती होणार की नाही याची चर्चा राज्यात आणि देशातही सुरू होती. महागठबंधन जोरात असताना युतीचं मात्र काही नक्की होत नव्हतं. जानेवारी महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले होते. आजही मातोश्रीवर युतीच्या अंतिम बोलणीत जे मोजके नेते सहभागी होते त्यात आदित्य ठाकरे यांचा समावेश होता. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेत आदित्य ठाकरे यांची भूमिका निर्णायक राहणार याचे स्पष्ट संकेत आहेत.
मुंबईत पोहोचल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नंतर भाजपच्या कोअर कमेटीची बैठक झाली. त्यानंतर सर्व नेते मंडळी मातोश्रीवर रवाना झाली. मातोश्रीत पोहोचल्यावर तळमजल्यावर ख्याली खुशाली विचारल्यावर मुख्यमंत्री आणि अमित शहा पहिल्या मजल्यावरच्या हॉलमध्ये चर्चेसाठी गेले. या चर्चेत शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते.
Post A Comment:
0 comments so far,add yours