मुंबई 11 फेब्रुवारी : भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी हे वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहे. टोकाची आणि स्पष्ट मतं व्यक्त करुन अनेकदा त्यांनी भाजपलाही अडचणीत आणलं आहे. मुंबईत रविवारी एका व्याख्यानात बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. देशातल्या हिंदू आणि मुस्लिमांचा DNA एकच आहे. हिंदू आणि मुस्लिम एकाच परिवाराचा भाग आहेत पण ते स्वत:ला घोरी, गझनीचे वंशज समजत असतील तर त्यांना या देशात स्थान नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
आणखी काय म्हणाले स्वामी?
मोदींनी या बाबत विचार करावा की जिंकून आल्यानंतर पहिल्यांदा राम मंदिराचा प्रश्न सोडवावा. मला नाही वाटत नाही की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होईल. कारण मी अनेक मुस्लिमांशी बोलत असतो. मशीद अमूक एकाच ठिकाणी असावी असं काही नाहीये ती कुठेही असू शकते. कोर्टाने पण म्हटलं आहे मशीद हा इस्मामचा अविभाज्य भाग नाहीये.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours