मुंबई, 23 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्ये जळगाव, सोलापूर, बारामती, दिंडोरी, नांदेड, पुणे या सहा मतदारसंघातील उमेदवार भाजपने घोषित केले आहेत. पुण्यातून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट कापत पालकमंत्री गिरीश बापट यांना संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, बारामतीतून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपची दुसरी यादी जाहीर, कुठून कोण लढणार?
जळगाव - स्मिता वाघ

नांदेड - प्रताप पाटील चिखलीकर
बारामती - कांचन राहुल कुल
दिंडोरी - भारती पवार
सोलापूर - जयसिद्धेश्वर स्वामी
बारामतीतून सुप्रिया सुळेंना कुल यांचे आव्हान
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन राहुल कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बारामतीमध्ये दोन महिला उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. रासप आमदार राहुल कुल यांचे काँग्रेस नेते हर्षधवर्धन पाटील आणि काँग्रेस आमदार संग्राम थोपटे या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचं बोललं जातं. त्यामुळे त्यांना या मतदारसंघात फायदा होऊ शकतो. शिवाय राहुल कुल हे स्वत: दौंड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यामुळे भाजपने त्यांच्या पत्नी कांचन कुल यांना तिकीट दिल्याची माहिती आहे. 
पुण्यातून शिरोळेंचा पत्ता कट
पुण्यातून भाजपने पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देत विद्यमान खासदार अनिल शिरोळे तिकीट नाकारले आहे. बापट गेली अनेक वर्ष खासदारकी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. अखेर अनिल शिरोळे यांना डच्चू देत पक्षाने बापट यांना संधी दिली आहे.
दरम्यान भाजपने याआधीच 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. 
असे आहेत महाराष्ट्रातील उमेदवार
नागपूर - नितीन गडकरी
धुळे- सुभाष भामरे
वर्धा - रामदास तडस
नंदुरबार - हीना गावित
रावेर - रक्षा खडसे
अकोला - संजय धोत्रे
गडचिरोली - अशोक महादेवराव नेते
चंद्रपूर - हंसराज गंगाराम अहिर
जालना - रावसाहेब दानवे
भिवंडी - कपिल पाटील
मुंबई उत्तर - गोपाल शेट्टी
उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन
अहमदनगर - सुजय विखे पाटील
बीड - डाॅ. प्रीतम मुंडे
लातूर - सुधाकरराव भालेराव-शृंगारे
सांगली - संजयकाका पाटील
लोकसभा निवडणुक 2019
लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.
11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम
18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-
बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर
23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान
नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours