मुंबई, 29 मार्च: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गुजरातमधील गांधीनगर येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अमित शहा यांचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी खुद्ध शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत. या घटनेमुळे शिवसेना आणि भाजप युती सर्वात घनिष्ठ झाल्याचे मानले जात आहे.
भाजपचे अमित शहा उद्या शनिवारी गांधीनगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित रहाणार आहेत. काल रात्रीच अमित शहा यांचा उद्धव ठाकरे यांना फोन आला होता. यावेळी दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. या चर्चेत अमित शहा यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येण्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना दिले होते. उद्धव ठाकरेंनीही अमित शहा यांचं निमंत्रण स्विकारले आहे. त्यामुळे शनिवारी जेव्हा अमित शहा उमेदवारी अर्ज भरतील त्यावेळी उद्धव ठाकरे देखील उपस्थित असणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे युतीतील ही खूप मोठी राजकीय घटना मानली जात आहे. या उपस्थितीमुळे शिवसेना आणि भाजप युतीतील आतापर्यंतचे सर्वाधीक घनिष्ठ संबंध निर्माण झाल्याचे राजकिय वर्तुळात बोलले जात आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours