मुंबई, 19 मार्च : माढा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये माढातून उमेदवार कोण? यावर खदखद सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आज तिसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये माढाच्या उमेदवारीची देखील घोषणा होऊ शकते. यावेळी विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते - पाटील यांचं तिकीट कापलं जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते -पाटील यांनी आता अकलूज या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. यावेळी मोहिते-पाटील आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असून पुढील रणनिती ठरण्याची शक्यता आहे. माढामधून प्रभाकर देशमुख यांचं नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळे नाराज विजयसिंह मोहिते - पाटील हे अन्य पर्यायाचा विचार करू शकतात का? तसेच केवळ पक्षावर दबावासाठी सर्व सुरू आहे? याकडे देखील सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours