मुंबई, 19 मार्च : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. फेब्रुवारी महिन्याचा पगार लांबल्यानं कर्मचारी आता संतप्त झाले आसून त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा मनस्तापाचा सामना सहन करावा लागणार की काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जानेवारी महिन्यात देखील बेस्ट कंर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. त्यावेळी जवळपास आठवडाभर हा संप चालला होता. पण, आता पुन्हा एकदा दोन महिन्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलनांचं हत्यार उपसलं आहे.
9 दिवस चालला होता संप
वाढीव पगार आणि विविध मागण्यांसाठी बेस्टनं जानेवारीमध्ये संप केला होता. आजवरचा तो सर्वात मोठा संप ठरला होता. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता. वडाळा इथं शंशाक राव यांची मोठी सभा पार पडली. या सभेला बेस्टच्या कामगारांनी मोठी गर्दी केली होती. 'सरकारच्या समितीचे प्रस्ताव आपण धुडकावून लावले, थातुरमातुर आश्वासनांना आपण भुललो नाही', असं राव म्हणाले होते. 'मागण्या मान्य झाल्या आहेत, त्यामुळे संप ताणण्यात काही अर्थ नाही',असंही त्यांनी कामगारांना समजवून सांगितलं होतं. त्यावेळी तब्बल 9 दिवस हा संप चालला होता.
Post A Comment:
0 comments so far,add yours