मुंबई:  महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यांतील मतदान सोमवारी शांततेत पार पडलं. या चौथ्या टप्प्यानंतर महाराष्ट्रातल्या  लोकसभेच्या सर्व 48 जागांसाठी मतदान पूर्ण झालंय. आजच्या शेवटच्या टप्प्यात 17 लोकसभा जागांसाठी अंदाजे 57 टक्के  मतदान झालं असून राज्यामध्ये चार टप्प्यात एकूण सरासरी 60.68 टक्के इतकं मतदान झालं आहे. महाराष्ट्रातल्या एकूण 8 कोटी 85 लाख 64 हजार 98 एवढ्या मतदारांपैकी 5 कोटी 37 लाख 41 हजार 204 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी दिली.
2014 च्या तुलनेत 2019च्या निवडणुकीतल्या मतदानाचं प्रमाण  सारखच राहील्याचं त्यांनी सांगितलं. कुमार म्हणाले, पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघासाठी ६३.४६ टक्के, दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघांसाठी ६२.८८ टक्के, तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघांसाठी ६२.३६ टक्के तर आज झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान झालं आहे.
मतदार संघाची टक्केवारी

सर्व 17 मतदार संघाची सायंकाळी ६ वाजेपर्यंतची मतदानाची अंदाजे टक्केवारी अशी  आहे : नंदुरबार - 67.64 टक्के, धुळे - 57.29 टक्के, दिंडोरी – 64.24 टक्के, नाशिक - 55.41 टक्के, पालघर - 64.09 टक्के, भिवंडी – 53.68 टक्के, कल्याण – 44.27 टक्के, ठाणे – 49.95 टक्के, मुंबई उत्तर – 59.32 टक्के, मुंबई उत्तर पश्चिम – 54.71 टक्के, मुंबई उत्तर पूर्व -56.31 टक्के, मुंबई उत्तर मध्य - 52.84 टक्के, मुंबई दक्षिण मध्य – 55.35 टक्के, मुंबई दक्षिण – 52.15 टक्के, मावळ – 59.12 टक्के, शिरुर -59.55 टक्के आणि शिर्डी – 66.42 टक्के.
तीन हजार तक्रारी
आयोगाला आतापर्यंत सी व्हीजील ॲपवर ३ हजार ९९१ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २ हजार २३१ तक्रारी योग्य असल्याने त्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेब साईटवर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी सुमारे १ कोटी ९९ लाख हिटस् झाल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours