नवी दिल्ली: शिवसेना हा भाजपचा मित्र असून तो कायम आमच्यासोबत होता असं मत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केलं. 'न्यूज18'च्या अजेंडा इंडिया या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात शहीदांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना आणि भाजप हे वैचारिक मित्र आहेत असंही ते म्हणाले.
या कार्यक्रमातून जो निधी जमा होईल तो निधी शहीद सैनिक कल्याण फंडात जमा करण्यात येईल अशी घोषणाही 'न्यूज18'ने केली आहे.
नेहरुंवर टीका
पाकिस्तानात असलेला दहशतवादी मसूद अझहर याच्यावर जागतिक बंदी घालण्याच्या प्रयत्नांना चीन खिळ घालत आहे. चीनला व्हेटोचा अधिकार असल्यामुळेच चीन असा प्रयत्न करतो आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांनीच भारताला मिळणारा व्हेटो अधिकार चीनला दिला असा आरोपही त्यांनी केला.
Post A Comment:
0 comments so far,add yours