मुंबई : मुंबईमध्ये बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 55 वर्षाच्या डॉक्टरांनी एका 21 वर्षाच्या मॉडेलवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी तपासानंतर आरोपी डॉक्टराला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मॉडेल एका मालिकेमध्ये काम करायची. एका ओळखीच्या मित्राकडून तिला डॉक्टरचा पत्ता मिळाला. त्वचेच्या ट्रिटमेंटसाठी मॉडेल डॉक्टरांकडे गेली होती. त्यावेळी त्यांची मैत्री झाली. 2017 मध्ये त्यांच्यात मैत्री झाली होती. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली होती. त्यावेळी ती आणि आरोपी डॉक्टर एकमेकांच्या संपर्कात आले. यानंतर डॉक्टरांकडून तरुणीवर बलात्कार करण्यात आला. यात आरोपी डॉक्टरविरोधात एका आठवड्याआधी एफआयआर दाखल करण्यात आली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours