वसई, 31 मे: वसईच्या वालीव परिसरात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पती आणि पत्नीवर एका अज्ञात व्यक्तीने अ‍ॅसीड हल्ला केला आहे. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी जखमी आहे. हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा ब्रिजजवळ मोटारसायकलवरील पती-पत्नी रस्ता पार करण्यासाठी थांबले असता एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. 
बी.पी. रोड दहिसर येथील दिशा अपार्टमेंटमध्ये राहणारे अविनाश तिवारी (वय-41) असे हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर पत्नी सीमा (वय -38) या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. अविनाश आणि सीमा हे दोघेही मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलमध्ये जेवण करून मोटारसायकलवरून घरी परत येत होते. वर्सोवा ब्रिजजवळ पेट्रोल पंपजवळ रस्ता दुभाजक जागेत ते थांबले होते. तेव्हा अज्ञात व्यक्तीने दोघांवर अ‍ॅसिड हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. हल्ल्यात अविनाथ यांचा मृत्यू झाला तर सीमा जखमी झाल्या आहेत. वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours