बीड: शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप पिकविमा नुकसान भरपाई मिळालेली नाही. बीड जिल्ह्यातील सुमारे 12 लाख शेतकरी पिकविमा नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. तात्काळ पिकविमा नुकसान भरपाईची रक्कम वाटप करा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
उन्हाळी मशागतीची कामं करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची आवश्यकता आहे. मात्र विमाधारक शेतक-यांना नुकसाना भरपाई मिळाली नसल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, कृषी संचालक, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांच्यासह आदींकडे याबाबत त्यांनी लेखी मागणी केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours