पुणे, 29 जून: पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील सोमजी पेट्रोल पंप जवळ असलेल्या आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत (compound wall collapse) कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. आल्कन स्टायलस सोसायटीच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांसाठी तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्यांच्या खोल्यावर रात्री दोनच्या सुमारास आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. भिंत मोठी असल्याने खालच्या बाजूला असलेल्या खोल्यांवर भिंतीचा मोठा ढिगारा पडला.
घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदत व बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेत मृत झालेले सर्व जण मजुर असल्याचे समजते. मध्यरात्री दोन ते अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांचे मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours