नवी दिल्ली, 29 जून : महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आज पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांसह इतरही काही नेते उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभरात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरी चांगलं यश मिळावं यासााठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. राहुल गांधी यांच्यासोबत होणाऱ्या आजच्या बैठकीत राज्यातील प्रदेशाध्यक्ष आणि आगामी विधानसभा निवडणूक या दृष्टिकोनातून चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला अवघी एक जागा जिंकता आली होती. नांदेडमधून तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊ केला होता. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांना पदावरून दूर केलं जातं का, हे पाहावं लागेल.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours