रिपोर्टर.. विलास केजलकर भंडारा शहर
भंडारा तालुक्यातील मौजा पांढरबोडी येथील अवैध मुरूम उत्खनन केल्या प्रकरणी कार्यवाही भंडारा तहसीलदार श्री अक्षय पोयाम यांनी कोणतीही कार्यवाही न केल्या प्रकरणी तसेच तहसीलदार श्री पोयाम, मंडळ अधिकारी श्री चतुर व तलाठी श्री कटकवार यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना  जिल्हा भंडारा च्या वतीने दिनांक 28 जून 2019 रोजी जिल्हाधिकारी श्री शांतनू गोयल यांचा पुतळा दहन करण्यात येईल असे निवेदन उपविभागिय अधिकारी श्री श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना देण्यात आले होते त्या अनुषंगाने भंडारा ठाणेदार श्री सुधाकर चव्हाण यांनी भंडारा तहदिलदार श्री अक्षय पोयाम यांचेशी समन्वय साधून त्यामध्ये श्री पोयाम यांनी सांगितले की मौजा पांढरबोडी प्रकरणात 30 दिवसात आम्ही कार्यवाही करू तसेच राकेश चोपकर यांनी सांगितले की या प्रकरणी 1 महिन्यात कार्यवाही झाली नाही तर शासनाशी कोणताही पत्रव्यवहार न करता स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाधिकारी यांचा पुतळा दहन करण्यात येईल तसेच संपूर्ण कार्यकर्त्यांना या प्रकरणी 1 महिना पूर्ण होईपर्यंत कोणतीही लक्षवेधी भूमिका घेऊ नये असे आव्हाहन जिल्हा प्रमुख श्री राकेश चोपकर यांनी केले आहे

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours