कल्याण 17 जुलै : मुंबई आणि परिसरात तब्बल दीड कोटी रुपयांचे मोबाईल चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटने बेड्या ठोकल्या. डोंबिवलीतल्या एका दुकानात चोरी करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. या चोरांची एक टोळी असून अशा चोऱ्या करून चोरलेले मोबाईल ही टोळी बांग्लादेशात विकत असल्याचं स्पष्ट झालं.पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून चार जण फरार आहेत.

आलम शेख असं या चोरट्याचं नाव असून तो मुंबई आणि उपनगरात मोठ्या मोबाईल दुकानांना लक्ष्य करत होता. काही महिन्यांपूर्वी त्याने मुंबईतल्या पश्चिम उपनगरात एका मोबाईल शॉपमध्ये भिंतीला भगदाड पाडून जवळपास एक कोटी रुपयांचे मोबाईल चोरले होते, तर कल्याणच्या एका मोबाईल शॉपमध्येही त्याने अशाच पद्धतीने लाखो रुपयांचे मोबाईल चोरले होते. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours