बीड, 11 ऑगस्ट : तीन वाहनांची धडक झाल्याने बीडमधील अंबाजोगाई इथं भीषण अपघात झाला आहे. लातूर रोडवर शनिवारी रात्री 9 वाजता झालेल्या या अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून इतर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.
अंबाजोगाईतील लातूर रोडवर नंदगोपाल दूध डेअरीच्या जवळ दोन कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. अपघात झाल्याचं कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात दोन जणांनी जागीच आपला प्राण गमावला. दीपक सवडतकर आणि ज्योती दिपक सवडतकर अशी मृतांची नावे आहेत. तिहेरी अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
या भीषण अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. त्यांना पोलिसांकडून स्थानिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विनोद जाधव (42), सुनील बिर्ला, गजानन निंबाळकर (35), राजेश बाळू उपाडे, संजय जोगदंड (30) अशी जखमींची नावं आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील रस्ते अपघातात गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या समस्येवर उत्तर काय, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours